Thursday, July 9, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

घातक रसायन सोडणारा कारखानदार मोकाटच!

पालघर दर्पण by पालघर दर्पण
December 3, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
घातक रसायन सोडणारा कारखानदार मोकाटच!
0
SHARES
194
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रदूषणकारी कारखानदारांंना मोकळे रान

पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांन कडून घातक रसायन नाल्यात सोडल्या प्रकरणी आठवडा उलटून जात असतानादेखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. यामुळे घातक रसायन सोडणारा कारखानदार मोकाट असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. यातच एका बड्या उद्योजकांचा हा कारखाना असल्याने अधिकाऱ्यांवर कारवाई साठी दबाव असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील प्लाँट नंबर एस 47 या रासायनिक कारखान्यातुन घातक रसायन चोरट्या पध्दतीने नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्या नंतर सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्वतः या कारखान्यांची तपासणी केली होती. मात्र याच वेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कारखानदारांच्या हस्तगता मार्फत प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना दुरध्वनी लावुन दिल्यानंतर राजपूत माघारी परतले होते. यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव नसुन कारखान्यांवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. परंतु आठवडा उलटून जात असताना देखील प्रदूषणकारी कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. महत्त्वाचे म्हणजे इतर एखाद्या कारखान्यांवर कारवाई करताना वेळेचा देखील विलंब न करता तातडीने कारखाना बंद ची कारवाई केली जात असली तरी या प्रदूषणकारी कारखान्याला मोकळीक का असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.

तारापूर मधील आरती ड्रग्स कारखान्यातील रसायन हे एस 47 या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया करण्याच्या नावाखाली आणले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा चोरटा प्रकार सुरू होता. कारखान्यातुन निघणारे घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रूपयाचा खर्च वर्षाकाठी येत असल्याने कारखानदारांने एस 47 याठिकाणी एक कारखाना घेवून त्याठिकाणी हे घातक रसायन थेट नाल्यात सोडले जात होते. महत्त्वाचे हे रसायन आरती ड्रग्स या कारखान्यांचे असल्याचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी घटनास्थळी असताना सांगितले होते. मात्र वरिष्ठ स्थरावरून एका राज्यमंत्री दर्जाच्या मंत्र्यांने फोन करून दबाव आणल्याचा प्रकार घडला असल्याने कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत खातरजमा करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांना खाजगीत जाऊन विचारणा केली असता त्यांनी दबक्या आवाजात बोलत वरिष्ठ स्थरावरून दबाव असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. यामुळे आता अशा प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई नक्की केव्हा होणार याबाबत साशंकता आहे.

◾एस झोन मध्ये नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाणी प्रकरणी एक अहवाल आल्या नंतर एस 47 या कारखान्यांवर कारवाई केली जाईल. तसेच ज्याठिकाणाहुन हे रसायन येत होते याबाबत देखील कारवाई बाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवला जाईल.

— मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
साऊथचा सुपरस्टार राजकीय आखाड्यात

साऊथचा सुपरस्टार राजकीय आखाड्यात

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

बंध व्यवसायाला करोनाचा फटका

बंध व्यवसायाला करोनाचा फटका

October 26, 2020
जिल्हाधिकारी कार्यालयात गृहस्ताने केला आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयात गृहस्ताने केला आत्महत्येचा प्रयत्न

April 21, 2021
मुखपट्टी परिधान न केल्याने पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना २०० रुपयांचा दंड

मुखपट्टी परिधान न केल्याने पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना २०० रुपयांचा दंड

February 16, 2021
लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहणाचा अपघात; एकाचा मृत्यू तर 22 जखमी

लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहणाचा अपघात; एकाचा मृत्यू तर 22 जखमी

May 24, 2020

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.