पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: येथील चिन्मय हॉस्पिटल येथे दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रकांत चौधरी (42) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बोईसर येथील चिन्मय रुग्णालयात 15 सप्टेंबर रोजी चंद्रकांत चौधरी यांना किडनी स्टोनचा त्रास झाल्याने दाखल करण्यात आले. रुग्णालयाचे बिल पाहिल्यावर त्यांना चक्कर आली त्यानंतर त्यांना पुन्हा याच रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. मात्र 19 सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता त्यांना पहाटे चार वाजताच्या सुमारास अतिदक्षता विभागातून सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. चंद्रकांत चौधरी यांनी त्यांना दाखल केलेल्या वार्डच्या समोरील रूममधून खाली उडी मारली चौधरी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

















