■करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या निर्णय; पुढील आदेश येई पर्यंत आठवडी बाजार बंदच ठेवण्याचे आदेश.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
पालघर : कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) चा प्रार्दुभाव व संसर्ग रोखण्याकरीता पालघर तालुक्यातील बोईसर,मनोर सफाळे येथील आठवडी बाजार बंद करण्यात आले असून पुन्हा सुरू करण्याचे पुढील आदेश येईपर्यत आठवडीबाजार बंद करण्याचे आदेश डॉ माणिक गुरसळ जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी दिले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येऊ नये. तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेमध्ये अधिकाधिक व्यक्तींनी एकत्र येऊ नये, थांबु नये, चर्चा करणे तसेच काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनलॉक नंतर पुन्हा आठवडी बाजार भरत होते मात्र या बाजारामध्ये जनतेचा गैरजबाबदार पणा दिसून आला. अनेकांनी मास्क परिधान केला नसून सोशल डिस्टनसिंगचे पालन देखील नागरिक करत नसल्याचे आढळून आले. या दरम्यान सर्व सामान्य जनतेस व त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना गर्दी टाळणे गरजेचे असल्यामूळे पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार बंद केले आहेत.
राज्यामध्ये व पालघर जिल्हयामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्हयात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोना विषाणुचा (कोविड-१९) संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणुचे (कोविड-१९) संसर्ग असल्यास त्यात अधिक वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. यामुळे पालघर जिल्हादंडाधिकारी यांनी बाजार व जत्रा अधिनियम १८६२ चे कलम ५(ग)(ग) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन कोरोना विषाणूच्या (कोविड-१९)चा प्रादुर्भाव लक्षात घेता पालघर तालुक्यातील पालघर, बोईसर, मनोर, सफाळे येथील आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश देत आहे. व जोपर्यंत बाजार पुन्हा खुले करण्याचे आदेश येत नाही तोपर्यंत आठवडी बाजार बंदच राहतील असे पालघर जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.