Thursday, May 28, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांची सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा

पालघर दर्पण by पालघर दर्पण
July 7, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
मुख्यमंत्र्यांची सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा
0
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना सूचना

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी करोनाच्या तिसऱ्या लाटे दरम्यान कशा प्रकारचे नियोज असेल यावर चर्चा केली.

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे. व ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे. तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून  कामगारांची तिथे राहण्याची (फिल्ड रेसिंडन्स) व्यवस्था करावी. त्यासाठीे त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. कोरोनाच्या दोन लाटेमधील हा काळ संयम आणि शिस्तीसाठी महत्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. त्याच बरोबर उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी  कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे. असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

*नियमांचे काटेकोरपणे पालन करा*

> अजुन कोरोनाची दुसरी लाट पुर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण सावधगिरी बाळगून काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करताना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. ते कागदावर राहणार नाहीत. ते काटेकोरपणे अंमलात येतील. कुठेही गर्दी होणार नाही. सभा, समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

> गर्दी टाळा आता पावसाळा आहे, या काळात साथीचे इतर आजार उदभवतात त्यात कोरोना  विषाणुचा प्रादुर्भाव आहे. याच काळात आपले सण, समारंभही सुरु होतात. ही सगळी परिस्थिती अतिशय काळजीपूर्वक हाताळण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्स‍िजनच्या तयारीचाही आढावा घेतला त्यांनी ऑक्स‍िजन निर्मिती, ऑक्स‍िजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी या सर्वच प्रक्रियेला वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. 

> लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जनजागृती करा. आशा- अंगणवाडीसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत गावागावात जनजागृती करून कोराना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेले सर्वजण दुसरा डोस वेळेत घेतील यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. लसीचे दोन्ही डोस घेऊन कोराना बाधित होणाऱ्यांची संख्या, त्याची स्थिती आणि कारणे याचे टास्कफोर्सने विश्लेषण करावे. ही माहिती संकलित करतांना ती अनुभवजन्य राहील (लसीचा पहिला डोस घेतला होता की दोन्ही) याची काळजी घ्यावी.

> पॉझेटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हयात केलेल्या उपाययोजना नंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तसेच हा दर आणखी कमी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड नियुक्त्या, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

*खासगी रुग्णालयांनी लसींचे डोस वाढवून मागावेत- आरोग्यमंत्री टोपे*

चाचण्या वाढवणे व गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझेटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल त्याकडे लक्ष  वेधले.  ऑक्स‍िजनची तयारी पूर्णत्वाला नेतांना जिल्ह्यांनी त्याच्या तांत्रिक आणि दर्जात्मक गुणवत्तेची काळजी घ्यावी. परमिट टु वर्क चा परवाना मिळवावा, सर्व काम शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे अशा सूचना दिल्या. कोरोना उपचाराच्या दरासंदर्भात आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. यासाठी ऑडिटर्सची नियुक्ती करावी, कंटेन्मेंट झोन संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे व लसीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते नागरिक दुसरा डोस घेतील हे पहावेे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा घ्यावा अशा सूचनाही  त्यांनी केल्या. या बैठका नियमित झाल्यास दाव्यांचे निकाली निघण्याचे प्रमाण वाढून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. टोपे यांनी सर्व जिल्ह्यांनी फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल  करण्याच्या सुचनेचा पुनरूच्चार केला. जिल्ह्यांनी  कोरोना बाधितांची माहिती  दररोज अद्ययावत (रिअल टाईम डेटा) स्वरूपात अपलोड करावी अशा सूचनाही यावेळी दिल्या.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
बोईसर मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

बोईसर मध्ये कापडी पिशव्यांचे वाटप

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

पालघर-ठाणे-मुंबई येथे रेड अलर्ट.

पालघर-ठाणे-मुंबई येथे रेड अलर्ट.

October 15, 2020
सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना मोकळीक

February 18, 2021
पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

पालघरच्या कृषी संशोधन केंद्रात शास्त्रज्ञांच्या खुर्च्या रिकाम्या

October 20, 2020
बोईसर मध्ये जीवनावश्‍यक वस्तू घरपोच!

बोईसर मध्ये जीवनावश्‍यक वस्तू घरपोच!

May 5, 2026

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.