Sunday, June 15, 2025
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य

पालघर दर्पण by पालघर दर्पण
June 2, 2021
in ताज्या बातम्या, राज्य
0
कोविडमुळे अनाथ बालकांना अर्थसहाय्य
0
SHARES
83
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

■ बालक सक्षम होईपर्यंत बालसंगोपन योजनेतून खर्च उचलणार; मुख्यमंत्री ठाकरे

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

मुंबई : कोविडमुळे आई-वडीलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्याच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या योजनेत १ मार्च २०२० रोजी व त्यानंतर कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्यू पावलेले, किंवा एका पालकाचा कोविड-१९ मुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पुर्वीच मृत्यू झाला असेल आणि त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास अशी शुन्य ते १८ वयोगटातील बालकांचा या योजनेत समावेश होणार आहे. कोविडमुळे आई आणि वडील असा दोघांचाही मृत्यू झाल्याने अनाथ झालेल्या बालकांचे भवितव्य अंधकारमय होऊ नये यासाठी भरीव अर्थसहाय्याची देण्याची ही योजना आहे. केंद्र शासनाच्या पीएम केअर योजनेतूनही अशीच योजना राबविण्यात येत आहे. पण त्याव्यतिरिक्तची योजना म्हणून महाराष्ट्र शासन ही योजना राबविणार आहे.

या योजनेत बालकाला बालगृहामध्ये दाखल करून किंवा संबंधित बालकांच्या नातेवाईंकाकडून संगोपन अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहे. ठेवीची ही रक्कम बालकाने वयाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळणार आहेत. बालकाचे संगोपन करण्यास कुटुंबातील कुणी इच्छूक नसल्यास, त्याला बालगृहात दाखल करण्यात येईल. त्याशिवाय त्याच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून बँक खात्यावर ठेवण्यात येईल. बालकाचे संगोपन करण्यास नातेवाईक पुढे आल्यास त्यांना महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतूनही अनुदान देण्यात येईल. त्याशिवाय संबंधित बालकाच्या नावावर पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल. मुदत ठेव बालक व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या संयुक्त बँक खात्यावर राहणार आहे.

कौटुंबिक वातावरणात राहिलेल्या व कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना सरसकट बालगृहांमध्ये दाखल करण्याऐवजी अशा अनाथ बालकांना कौटुंबिक वातावरण उपलब्ध व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आर्थिक सहाय्य योजना महत्वाची ठरणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स (कृती दल) गठीत करण्यात आलेला आहे. या कृती दलाकडे कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांबाबतची माहिती संकलीत करणे, बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके बाल कामगार, अनैतिक मानवी वाहतूक, मानवी तस्करी यास बळी पडणार नाहीत याची काळजी घेणे, बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेणे आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे किंवा बालगृहात दाखल करणे अशा जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व कोविड संसर्गामुळे अनाथ झालेल्या बालकांची कागदपत्रे कृतीदलासमोर सादर करुन अनाथ बालकांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची असुन योजनेच्या अटी व शर्तीबाबतची सविस्तर माहिती याबाबतच्या शासन निर्णयातही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आजच शेअर करा

Related Posts

घिवली गावाचा सरपंच बनावट…
जिल्हा

घिवली गावाचा सरपंच बनावट…

May 5, 2025
गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
जिल्हा

गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..

May 5, 2025
वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
जिल्हा

वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?

May 1, 2025
कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
जिल्हा

कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान

April 24, 2025
भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू
जिल्हा

भरतच्या बुडत्या विमानाला कोणाचा टेकू

April 24, 2025
डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..
जिल्हा

डहाणू बॅक पोखरून खाणारा पुन्हा निवडणूक उभा..

April 22, 2025
Next Post
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह योजना

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह योजना

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

October 17, 2021
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

February 25, 2021

EDITOR'S PICK

सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

सरोवराच्या २१० मध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्षांची दारूची पार्टी

December 27, 2022
वाड्यात रबर कंपनीला भिषण आग

वाड्यात रबर कंपनीला भिषण आग

May 24, 2020
डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू

डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज पडून एकाचा मृत्यू

September 6, 2020
वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

वसईत एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांचा राडा

January 5, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • घिवली गावाचा सरपंच बनावट…
  • गडचिंचले नंतर बदनाम झालेला पालघर नव्या वाटेवर..
  • वाणगावच्या घोटाळेबाज कोरे कुटुंबीयांवर कारवाई कधी?
  • कोलंबी प्रकल्पात बस्तान मांडलेल्या भरत वर प्रशासन मेहेरबान
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!