◾ लाचखोर पोलिसाला ताब्यात घेतल्यानंतर सक्रिय झाले बोईसर पोलीस; वाहन तपासणी सुरू केल्याने एक दोन किलोमीटर लांब वाहनांची रांग
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: वसुलीसाठी असलेल्या बोईसर येथील बेटेगाव चौकीवर पोलीस सक्रिय झाल्याचे शनिवारी सायंकाळी दिसून आले. याठिकाणी सर्व वाहनांची कागदपत्रे तपासणी सुरू केल्याने लांबवर वाहनांची रांग लागली होती. यामुळे खैरापाडा उड्डाणपूल ते मान भागापर्यंत वाहनांची रांग लागलेली दिसून आली.
हप्तेखोरीत प्रसिद्ध असलेल्या बोईसर पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक व एका शिपाई यांना शुक्रवारी लाच घेताना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी बोईसर पोलिस आपल्या कामात सक्रिय झालेले दिसून आले. शिट्टी वाजवून वाहन थांबवुन वसुली होणाऱ्या बेटेगाव चौकीवर शनिवारी सायंकाळी 6 वाजता पासूनच वाहने तपासणी सुरू करण्यात आली. यावेळी औद्योगिक क्षेत्रातून सुटणारे कामगार व बस अनेक वाहने या मुख्य रस्त्यावरून जात असतात. बेटेगाव यासाठी कधी नवे ती वाहनांची तपासणी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झाली होती. सायंकाळी 6:30 वाजता याठिकाणी दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा याठिकाणी लागल्या असून वाहने खोळंबुन पडली होती.
◾ वसुली होणाऱ्या बेटेगाव चौकीवर रात्रीच्या वेळी मात्र कोणत्याही प्रकारच्या वाहनांची तपासणी केली जात नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. रात्रीच्या वेळी तडजोड करून केमिकल वाहने देखील याठीकाणाहुन सोडण्यात आली आहेत. अनेकदा पालघर पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.