Thursday, June 18, 2026
पालघर दर्पण
No Result
View All Result
  • Login
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper
No Result
View All Result
Palghar Darpan
No Result
View All Result
Home जिल्हा

सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांन कडून मोकळीक

पालघर दर्पण by पालघर दर्पण
November 16, 2020
in जिल्हा, ताज्या बातम्या
0
सुनावणीच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांन कडून मोकळीक
0
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on TwitterLinkedin

◾मनोरमध्ये घरदुरुस्तीच्या परवानगीने बांधल्या जात आहेत व्यावसायिक इमारती.

पालघर दर्पण, प्रतिनिधी

हे पण वाचा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

मनोर : ग्रामपंचायतीकडून घर दुरुस्तीची परवानगी घेत मनोर मध्ये अनधिकृतपणे व्यवसायिक इमारतींची बांधकामे करण्यात आली आहेत. मनोर मधील अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी नंतर पालघरच्या तहसीलदारांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणी नोटीस बजावत आवश्यक कागदपत्रांची मागणी केली होती. परंतु सुनावणी वेळी तहसीलदारांनी आश्चर्यकारक रित्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना कागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ देत पुढील सुनावणीची तारीखही निश्चित केली नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या भूमिकेवर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच मनोरमधील अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांनी अभय दिल्याची चर्चा मनोरमध्ये सुरू आहे.

मनोर गाव जिल्हा मुख्यालयापासून वीस किलोमीटर अंतरावर तसेच महामार्गालगत असल्याने मनोरचे शहरीकरण होत आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील आणि परजिल्ह्यातील नागरिकांची मनोरमध्ये गर्दी वाढल्याने घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे मनोर ग्रामपंचायत हद्दीत अनेक गृहनिर्माण प्रकल्प आणि इमारतींची बांधकामे सुरू झाली आहेत. यात अनेक इमारतींची बांधकामे ग्रामपंचायतीच्या घर दुरुस्ती परवानगीने अनधिकृतरित्या करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. परंतु ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या हरकतींना ग्रामपंचायतीकडून केराची टोपली दाखवण्यात आली होती.

गेल्या वर्षी मनोर गावातील मिळकत क्र.77/अ, 7/1,7/2,7/3 आणि 20,120 या ठिकाणी जुने बांधकाम तोडून नवीन व्यावसायिक इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने बांधकाम परवानगी नाकारली होती. त्यानंतरही जागा मालकांनी इमारतींचे बांधकाम सुरूच ठेऊन इमारतींचे बांधकाम पूर्ण केल्याचे समोर आले आहे. या बांधकाम प्रकरणी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

मनोर ग्रामपंचायत हद्दीत घर दुरुस्तीच्या परवानगी घेऊन अनधिकृतपणे व्यवसायिक इमारतींची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी विकासकांना जमिनीची कागदपत्रे,बांधकाम परवानगी सह लेखी खुलासा करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात हजर राहण्याची तंबी तहसीलदारांककडून देण्यात आली होती. त्यामुळे मनोर मधील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

मनोर गावातील अनधिकृत बांधकामांवर तहसीलदारांनी कारवाईचा फास आवळल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करीत केला होता. परंतु सुनावणी वेळी तहसीलदारांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनाकागदपत्रे सादर करण्यास मुदतवाढ दिली तसेच दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली नाही.
त्यामुळे ग्रामस्थांकडून तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.तसेच मनोरच्या अनधिकृत बांधकामांना तहसीलदारांनी अभय दिल्याची चर्चा मनोर गावात सुरू आहे.

◾मनोर मधील अनधिकृत बांधकाम प्रकरणी सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. लवकर सुनावणी घेण्यात येईल.
— सुनील शिंदे
तहसीलदार, पालघर.

आजच शेअर करा

Related Posts

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
जिल्हा

स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू

May 5, 2026
युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
जिल्हा

युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती

May 5, 2026
बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
जिल्हा

बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !

February 9, 2026
स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
जिल्हा

स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..

April 13, 2026
विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!
जिल्हा

विराज प्रोफाईलच्या नावाखाली तारापूरमध्ये विषारी सांडपाण्याचा बेकायदेशीर धंदा!

February 5, 2026
वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार
जिल्हा

वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराचा मोठा हातभार

March 20, 2026
Next Post
विरार रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ अवैध रित्या रस्त्यांवर पार्किंग

विरार रेल्वे स्थानकाबाहेर वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ अवैध रित्या रस्त्यांवर पार्किंग

POPULAR NEWS

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

बोईसरचा लाचखोर पोलीस अखेर सापडला

May 15, 2021
शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

शिवसेनेच्या सुमित पिंपळेने घातला 1 कोटी 28 लाखाचा गंडा

December 17, 2021
स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

स्पा सेंटर मध्ये सेक्स रॅकेट

April 13, 2026
बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

April 13, 2026
राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

राठोड कार्यालय दरोड्यात आरोपीचे दाऊद गॅग कनेक्शन!

April 4, 2023

EDITOR'S PICK

धरणात बुडून तरुणाचा बुडून मृत्यू

धरणात बुडून तरुणाचा बुडून मृत्यू

November 2, 2020
मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मान्सूनपूर्व कामात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी ८ दिवसाच्या आत पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

March 3, 2021

अंड्यांच्या दरात वाढ

May 5, 2026
आदिवासी शेतकरी मोगरा लागवडीकडे

आदिवासी शेतकरी मोगरा लागवडीकडे

March 3, 2021

Download Android app

Google Play Store Logo

Follow us

Categories

  • जिल्हा
  • ताज्या बातम्या
  • देश
  • नारी
  • मुंबई
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • संपादकीय

Recent Posts

  • स्थानिक दलालांना हाताशी धरून मोकळ्या जागेत दाखवली लाखोची झाडे; वाढवण बंदर भूसंपादन प्रक्रियेची पुन्हा तपासणी सुरू
  • युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी साईराज पाटील यांची पुनर्नियुक्ती
  • बोईसर मध्ये सत्ताधाऱ्यांनी लुटले ३ कोटी ५० लाख !
  • स्थानिकांनी हाकलले; पालकमंत्र्यांनी झापले..
  • Site Map
  • मुखपृष्ठ
  • E-PAPER
  • Addvertiaement

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • देश
  • विदेश
  • राज्य
  • जिल्हा
  • व्हिडीओ
  • नारी
  • शैक्षणिक
  • लेख
  • संपादकीय
  • E-Paper

© 2020 Palghar Darpan - WEBSITE DESIGN & DEVELOPMENT BY INTECHNIQ.